Special Report | भाजपच्या मिशन बारामतीवरुन दादांची टीका

| Updated on: Sep 08, 2022 | 10:20 PM

भाजपनं 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी 45 जागांचं टार्गेट निश्चित केलंय. आणि त्यात बारामतीच्या जागेकडे खास लक्ष केंद्रीत केलंय. बारामतीतल्या मेळाव्यातून पडळकरांनी तर पवारांनाच आव्हान दिलं होतं.

मुंबई : भाजपच्या मिशन बारामतीवरुन अजित पवारांनी, भाजपच्या नेत्यांना चांगलेच शाब्दिक टोले लगावले. 2 दिवसांआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी, बारामतीत मेळावा घेत बारामती मिशनची सुरुवात केली. मात्र ज्याला आमदारकीचच तिकीट मिळत नाही, ते काय 1 लाख मतांनी विजयाचे दावे करणार ? असा पलटवार अजित पवारांनी केला. भाजपनं 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी 45 जागांचं टार्गेट निश्चित केलंय. आणि त्यात बारामतीच्या जागेकडे खास लक्ष केंद्रीत केलंय. बारामतीतल्या मेळाव्यातून पडळकरांनी तर पवारांनाच आव्हान दिलं होतं. त्याचा समाचार अजित पवारांनी घेतला.

Published on: Sep 08, 2022 10:20 PM