अजित पवार यांचा ठाम विश्वास, निवडणूका लागतील तेव्हा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने उभा
त्रयस्थ नागरिक म्हणून माझं मत आहे की, महाराष्ट्रातील शिवसैनिक हा जेव्हा निवडणूका लागतील तेव्हा त्यांच्याच पाठिशी उभा राहिल आणि त्यांच्या विचाराच्या उमेदवारांना निवडून देतील,
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हा अनपेक्षित आहे. सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे की 21 फेब्रुवारीपासून दोघांचं म्हणणं ऐकून घेऊन काय असेल तो निर्णय देतील. असं असताना एवढी घाई का केली ? हे कळायला मार्ग नाही. निवडणूक आयोगाने निकाल दिलेला असला तरी माझं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे वरच्या कोर्टात जातील आणि त्यांच्याकडे न्याय मागतील. त्रयस्थ नागरिक म्हणून माझं मत आहे की, महाराष्ट्रातील शिवसैनिक हा जेव्हा निवडणूका लागतील तेव्हा त्यांच्याच पाठिशी उभा राहिल आणि त्यांच्या विचाराच्या उमेदवारांना निवडून देतील, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Published on: Feb 17, 2023 09:25 PM
Latest Videos