अजित पवार यांनी घेतला राज्याच्या मंत्रालयातील 'या' केबिनचा ताबा!

अजित पवार यांनी घेतला राज्याच्या मंत्रालयातील ‘या’ केबिनचा ताबा!

| Updated on: Jul 14, 2023 | 12:09 PM

राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार सत्तेत सामील झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर आज अजित पवार यांनी मंत्रालयात येऊन कामाला सुरुवात केली आहे.

मुंबई: राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार सत्तेत सामील झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर आज अजित पवार यांनी मंत्रालयात येऊन कामाला सुरुवात केली आहे. त्यांना केबिनही देण्यात आली आहे.अजित पवार यांच्यासाठी पाचव्या मजल्यावर 502 क्रमांकाची केबिन देण्यात आली आहे. याआधी अजित पवार यांनी शापित केबिन 602 ही केबिन घेतली नाही. त्यामुळे बाजूच्या दोन केबिन एकत्रित करण्याचं काम सुरू असून ही नवी केबिन अजित पवार यांना देण्यात येणार आहे. अजित पवार यांना 502 क्रमांकाच्या केबिनमध्ये तात्पुरती बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या केबिनच्या बाहेर अजितदादा यांचं नावही लिहिण्यात आलं आहे.

Published on: Jul 14, 2023 12:09 PM