चैत्यभूमीवर दाखल होताच ‘या’ कारणामुळे अजित पवार संतापले, नेमकं काय घडलं?
आज ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातील अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. तर आज सकाळीत अजित पवार हे दादर येथील चैत्यभूमीवर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी तेथील परिसराचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहलही अजित पवार यांच्यासोबत उपस्थित होते.
मुंबई, ६ डिसेंबर २०२३ : १ डिसेंबरपासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर दाखल होण्यास सुरूवात होत असते. आज ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातील अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. आज दादरच्या चैत्यभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज्यपाल देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभुमीवर दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दादर येथील चैत्यभूमीतील प्रक्षेक गॅलरी, अर्थात व्ह्यूईंग गॅलरीच्या पाहणीदरम्यान अजित पवार हे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर संतापल्याचे पाहायला मिळाले. व्ह्यूईंग गॅलरीत अस्वच्छता असल्याने अजितदादा भडकले. इतकंच नाही तर त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्यात. आज सकाळीत अजित पवार हे दादर येथील चैत्यभूमीवर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी तेथील परिसराचा आढावा घेतला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहलही अजित पवार यांच्यासोबत उपस्थित होते.