अजित पवार गटाची मोठी खेळी; शरद पवार यांच्यासोबतच्या आमदारांना मंत्रिपद देण्याचं दिलं आश्वासन!

अजित पवार गटाची मोठी खेळी; शरद पवार यांच्यासोबतच्या आमदारांना मंत्रिपद देण्याचं दिलं आश्वासन!

| Updated on: Jul 26, 2023 | 11:36 AM

अजित पवार गटाकडून आता शरद पवार गटाच्या आमदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. शरद पवारसोबतच्या आमदारांना मंत्रिपद देण्याची आश्वासन देण्यात आली आहेत.

मुंबई, 26 जुलै 2023 | अजित पवार आपल्या काही आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार यांनी आपल्याकडे आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे. तर शरद पवार यांच्याकडे 16 आमदार असल्याची माहिती आहे. यानंतर अजित पवार गटाकडून आता शरद पवार गटाच्या आमदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. शरद पवारसोबतच्या आमदारांना मंत्रिपद देण्याची आश्वासन देण्यात आली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात शरद पवार गटाचे आमदार शपथ घेणार असल्याची माहिती, सूत्रांकडून मिळाली आहे.

Published on: Jul 26, 2023 11:36 AM