जयंत पाटील हे अमित शाह यांना भेटल्याच्या चर्चांवर अजित पवार यांचा मोठा खुलासा, म्हणाले…
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार गटातून नेते, आमदार, खासदार हे अजित पवार गटात गेले. यानंतर आता राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट असे गट तयार झाले आहेत.
मुंबई, 7 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून अजित पवार यांनी राज्याच्या शिंदे-भाजप युतीत प्रवेश केला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शरद पवार गटातून नेते, आमदार, खासदार हे अजित पवार गटात गेले. यानंतर आता राष्ट्रवादीत अजित पवार गट आणि शरद पवार गट असे गट तयार झाले आहेत. याचदरम्यान आता शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेले जयंत पाटील हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तर याबाबत त्यांच्यात आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात भेट झाल्याचे देखील बोलले जात आहे. यावरून आता अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतच स्पष्ट केलं की जयंत पाटील आणि अमित शाह यांच्यात कोणतीच भेट झालेली नाही. किंवा त्यांच्यात असे कोणतेही बोलणं झालेलं नाही. जयंत पाटील हे काल शरद पवार यांच्याबरोबर होते. जर ते भटले असतील तर सांगितलं असतनां? असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.