Ajit Pawar : आम्ही कुठं बोललो, माझ्या काकांना जाणता राजा म्हणा
शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यावरून अनेकदा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावर अजित पवार यांनी आज भाष्य केल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. जाणता राजा असं छत्रपती शिवाजी महाराज यांना म्हणतात तेच शरद पवार यांना म्हणत असतात असं विचारलं होतं.
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हतेच असं विधान करत अजित पवार यांनी राज्यात वादाचा विषय समोर आणला होता. तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत संभाजीराजे स्वराज्यरक्षक होते असं विधान केलं होतं. त्यावर जोरदार निदर्शने आणि आंदोलने झाली. त्यांनंतर आता त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. आणि विरोधकांनाच प्रतिसवाल करत आम्ही कुठं म्हणतोय असा सवाल केला.
शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यावरून अनेकदा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावर अजित पवार यांनी आज भाष्य केल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे. जाणता राजा असं छत्रपती शिवाजी महाराज यांना म्हणतात तेच शरद पवार यांना म्हणत असतात असं विचारलं होतं.
पत्रकारांनी विचारेल्या या प्रश्नावर अजित पवार यांनी थेट उत्तर दिलं. तसेच त्यांनी, मी कुठं सांगितलं की माझ्या काकाला जाणता राजा म्हणा.