‘शिंदे यांच्यावर काही बोललं की लगेच हे गूबू गूबू करतंय’अजित पवारांची कोणावर खरमरीत टिका?

‘शिंदे यांच्यावर काही बोललं की लगेच हे गूबू गूबू करतंय’अजित पवारांची कोणावर खरमरीत टिका?

| Updated on: May 29, 2023 | 7:37 AM

त्यांनी कराड चिपळून रस्त्याचे कामावरून शिंदे गटातील मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले, कराड चिपळून रस्त्याचे काम किती वर्ष झालं सुरु आहे, इथला आमदार काय करतोय?

सातारा : राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या शैलीत खळखट्याक केलं आहे. यावेळी त्यांनी कराड चिपळून रस्त्याचे कामावरून शिंदे गटातील मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले, कराड चिपळून रस्त्याचे काम किती वर्ष झालं सुरु आहे, इथला आमदार काय करतोय? तर जरा काही राज्यात देशात झालं की टीव्हीच्या पुढे हेच. शिंदे साहेबांवर बोलले तरी हेच. बोलण्याचा मक्ता यालाच दिला आहे काय? कोणावर बोललं तरी हीच भू..भू..भू. कुणावरही झाल की यांनीच बोलायचे, माणसाने सत्ता आली की सत्तेची नशा चढू द्यायची नसते, अशी टीका अजित पवार यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली आहे. तर देसाई यांनी पाटण बाजार समितीच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे नेते विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाड्यासमोर शड्डू ठोकला होता, यावरूनही अजित पवर यांनी देसाई यांना टोला लगावला आहे. शड्डू ठोकून विकासकामे होत नाहीत, आपली तब्बेत काय, आपण करतोय काय? असे म्हणत त्यांनी देसाई यांची खिल्ली उडवली आहे.

Published on: May 29, 2023 07:37 AM