‘आत्ता कुठं विरोधी पक्ष नेते झालेत अन्… ’, वडेट्टीवार यांच्या त्या वक्तव्याचा अजित पवार यांच्याकडून खरपूस समाचार
मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामात अजित पवार हे ढवळाढवळ करत असून त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमचा बैठकीसाठी वापर केला जातोय असाही आरोप त्यांना केला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल करताना दोनच शब्दात वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे.
पुणे, 12 ऑगस्ट 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामात अजित पवार हे ढवळाढवळ करत असून त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमचा बैठकीसाठी वापर केला जातोय असाही आरोप त्यांना केला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल करताना दोनच शब्दात वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. ही टीका त्यांनी चांदणी चौक पुलाचे उद्घाटना प्रसंगी केली. यावेळी त्यांनी, मी येथे विकासासाठी आलो आहे. तर ह्यांना उद्योग नाही. आत्ता कुठं हे विरोधी पक्ष नेते झालेत. कुठं यांना कोल्ड दिसलं आणि कुठं यांना वॉर दिसला? असं म्हटलं आहे.
Published on: Aug 12, 2023 03:24 PM
Latest Videos