दशतवादी हल्ला, महापूर ते नैसर्गिक आपत्ती, मुंबईकर एकजूटीने लढतात, अजित पवार यांच्याकडून मुंबईकरांना सलाम

“दशतवादी हल्ला, महापूर ते नैसर्गिक आपत्ती, मुंबईकर एकजूटीने लढतात”, अजित पवार यांच्याकडून मुंबईकरांना सलाम

| Updated on: Aug 09, 2023 | 12:08 PM

ऑगस्ट क्रांती दिनाला आज 81 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑगस्ट क्रांती मैदानातील कार्यक्रमात उपस्थिती लावली.

मुंबई, 09 ऑगस्ट 2023 | ऑगस्ट क्रांती दिनाला आज 81 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑगस्ट क्रांती मैदानातील कार्यक्रमात उपस्थिती लावली. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईकरांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. “प्रत्येक गावातील मूठभर माती एकत्र करून पंतप्रधान नरेंद्र मोदीकडे पाठवणार. पीएम मोदींनी मन की बात कार्यक्रमात या मोहिमेची घोषणा केली होती. त्यात महाराष्ट्र सहभागी होणार असल्याचे पवार म्हणाले.

Published on: Aug 09, 2023 12:08 PM