Ajit Pawar: 'दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही', फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

Ajit Pawar: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, फक्कड भाषेत अजित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

| Updated on: Jul 03, 2022 | 4:55 PM

अजितदादांच्या खूमासदार भाषणाने सभागृहात हश्या पिकला

मुंबई: ‘दादा बाकडं वाजवू नका, तुमचं मंत्रीपदचं येईल की नाही सांगता येत नाही’, सडतोड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना आजच्या आपल्या दमदार भाषणात टोला हाणला. भाजपचे नेते राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडून आले, त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना दादांनी चौफेर बॅटिंग केली. ‘भाजपच्या 105 आमदारांनी त्यांच्या सदसदविवेकबुद्धीला स्मरुन खरंच आपलं समाधान झालं का ?’ शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर भाजपासोबतचा सत्तास्थापनेच्या प्रयोगावर त्यांनी भाजपच्या आमदारांना (BJP MLA) चिमटा काढला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या फुटीर आमदारांकडे(Shivsena MLA) मोर्चा वळत, 40 आमदारांपैकी कितीला मंत्रिपद मिळेल ? असा प्रश्न केला. त्यातून या बडांचा त्यांना फायदा झाला का? असा सवालच दादांनी बंडखोरांना विचारला. दादांच्या या बहारदार भाषणानं सभागृहात एकच हस्यकल्लोळ उडाला. चंद्रकांत दादा, भाजप आणि शिवसेनाच्या सत्ता स्थापनेच्या प्रयोगाचा अजित पवार यांनी खरपूस समाचार घेतला.