अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तरी ‘पाटी’तीच! पद विरोधी पक्षनेताच; नावाच्या पाटी बदलच नाही

अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तरी ‘पाटी’तीच! पद विरोधी पक्षनेताच; नावाच्या पाटी बदलच नाही

| Updated on: Jul 17, 2023 | 2:59 PM

आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत प्रश्न उपस्थित केले आहे. तर पाऊस आणि पेरण्यावरून सरकारला घेरलं आहे. याचबरोबर विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर थेट अक्षेप घेण्यात आता आहे.

मुंबई, 17 जुलै 2023 | राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या वेगवेगळ्या विषयांमुळे गाजताना दिसत आहे. आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत प्रश्न उपस्थित केले आहे. तर पाऊस आणि पेरण्यावरून सरकारला घेरलं आहे. याचबरोबर विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर थेट अक्षेप घेण्यात आता आहे. याचदरम्यान विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यालयातून धक्कादायक बाब समोर आली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर त्यांनी पक्षावर आपला दावा सांगितला होता. तर विधान भवनातील पक्षाच्या कार्यालयावर ताबा घेतला. त्यानंतर आता या कार्यालयावरील अजित पवार यांच्या नावाच्या पाटीत कोणताही बदल न करण्यात आल्याचे समोर आले आहे. तर अजित पवार यांच्या विरोधी पक्षनेत्याचीच पाटीच तेथे असल्याचे समोर आले आहे. अजित पवार आता उपमुख्यमंत्री झाले असले तरिही त्यांच्या कार्यालयातील पाटीवर मात्र विरोधी पक्षनेते असाच उल्लेख तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाच्या पाटीवर पक्षनेते आणि गटनेते असाच उल्लेख आहे.

Published on: Jul 17, 2023 02:59 PM