अजित पवार यांचा आज जनता दरबार, समस्या सांगण्यासाठी लोकांची गर्दी

अजित पवार यांचा आज जनता दरबार, समस्या सांगण्यासाठी लोकांची गर्दी

| Updated on: Sep 24, 2022 | 2:10 PM

विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीत आहेत. विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांचा जनता दरबार होतोय.

बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामतीत (Baramati) आहेत. विद्या प्रतिष्ठानमध्ये त्यांचा जनता दरबार होतोय. या जनता दरबारला नागरिकांनी गर्दी केली आहे. अजितदादांना भेटण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. आपल्या समस्या सांगण्यासाठी बारामती तालुक्यातील विविध गावातून लोक आले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीतील विकास कामांची पाहणी केली. तीन हत्ती चौकातील सिटी सेंट्रल चौकाच्या कामाची पाहणी केली. कामाबाबत अधिकारी वर्गाला त्यांनी सूचना दिल्या आहेत.

Published on: Sep 24, 2022 02:09 PM