अजित पवार यांचा मास्टर स्ट्रोक तिसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्री म्हणून शपथ
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश करत महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांचा भूकंप आणला. 2019 मध्ये पहाटेचा शपथ विधी करत त्यांनी राजकीय भूकंप केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तीन वर्षातच दुसऱ्यांना तसं केलं आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडला. त्यांनी आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश करत महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांचा भूकंप आणला. 2019 मध्ये पहाटेचा शपथ विधी करत त्यांनी राजकीय भूकंप केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तीन वर्षातच दुसऱ्यांना तसं केलं आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे त्यांनी तीन वर्षात तीनदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर विरोधी पक्ष नेते पद सोडून सरकारमध्ये सामिल होणार ते दुसरे ठरले आहेत. याच्या आधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर यावेळी अजित पवार यांनी आपल्या गटासह शिंदे -फडणवीस सरकारमध्ये जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर छगन भूजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह 6 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.
Published on: Jul 02, 2023 03:30 PM
Latest Videos