‘अवतार शकुनीचा नाम मात्र “×××” धारी’, भाजप नेते अशिष शेलार यांनी ट्विट करत कोणाला डिवचलं
राष्ट्रवादी फोडण्यात भाजपचा हात असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी म्हटलं होते. त्यावरून भाजपने देखील जोरदार प्रतुत्तर दिलं आहे.
मुंबई : अजित पवार यांनी सत्तेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह मविआमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे. तर राष्ट्रवादी फोडण्यात भाजपचा हात असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी म्हटलं होते. त्यावरून भाजपने देखील जोरदार प्रतुत्तर दिलं आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विट करत टीका करताना, अहंकारी राजा आणि पुत्र विलासी दिमतीला ठेवला शापित दरबारी, अवतार शकुनीचा नाम मात्र “संजय” धारी अशी टीका उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊत यांच्यावर केली आहे. तर सत्ता गेली, पक्ष ही गेला काय झाली अवस्था म्हणत फक्त अहंकारी राजा, विलासी पुत्र आणि संजय तेवढा उरला उरल्याची टीका केली आहे. तर अजित पवार यांच्यावरून शरद पवार यांचा चिमटा घेताना, जाणत्या राजांना याच संजयचा मोह झाल्यानेच आज राष्ट्रवादीला फटका बसल्याचंही ते म्हणालेत.