Ajit pawar news : अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या मंत्र्यावर अपात्रतेची टांगती तलवार? नार्वेकर म्हणतात...

Ajit pawar news : अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या मंत्र्यावर अपात्रतेची टांगती तलवार? नार्वेकर म्हणतात…

| Updated on: Jul 03, 2023 | 1:50 PM

राजकीय भूकंपामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. याचदरम्यान अजित पवार आणि इतर आठ आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिली

मुंबई : अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसला सुरूंग लावत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्यांनी केलेल्या राजकीय भूकंपामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. याचदरम्यान अजित पवार आणि इतर आठ आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिली. त्यावरून नार्वेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी यावरून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आलेल्या याचिकेवर योग्य ती पावलं उचलं असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासह इतर 8 जाणांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. तर याबाबत नार्वेकर म्हणाले, राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना अपात्र ठरवणारी जयंत पाटील यांची याचिका मला मिळाली आहे. मी ती आधी नीट वाचेन. त्यात नमूद केलेल्या बाबींचा मी अभ्यास करून याचिकेवर योग्य तो निर्णय घेईन.

Published on: Jul 03, 2023 01:50 PM