देवेंद्रजी, विरोधी पक्षालाही काही किंमत असते, इकडे जरा लक्ष द्या; अजित पवार आक्रमक

देवेंद्रजी, विरोधी पक्षालाही काही किंमत असते, इकडे जरा लक्ष द्या; अजित पवार आक्रमक

| Updated on: Feb 09, 2023 | 12:58 PM

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काल रात्री हल्ला करण्यात आला आहे. त्यावरून अजित पवार आक्रमक झाले आहेत, ते काय म्हणालेत पाहा...

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर काल रात्री हल्ला करण्यात आला आहे. प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारही यावरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणी लक्ष घालण्यास सांगितलं आहे. “देवेंद्रजी, तुम्ही गृहमंत्री आहात. जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींवर जर हल्ला करण्यात येत असेल तर इतर महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहतो.  त्यामुळे प्रज्ञा सातव यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्यात यावी”, असं अजित पवार म्हणालेत.

Published on: Feb 09, 2023 12:56 PM