आमदारांना निधी वाटपात दुजाभाव झाल्याच्या आरोपांवर अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...

आमदारांना निधी वाटपात दुजाभाव झाल्याच्या आरोपांवर अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

| Updated on: Jul 24, 2023 | 1:30 PM

अजित पवार यांनी अर्थखात्याची जबाबदारी स्वीकारताच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निधीवर्षाव केला आहे. शिंदे गटातील नेत्यांनाही निधी वाटप करून खूश करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला आहे. मात्र मविआतील नेत्यांना निधी दिलेला नाही. त्यामुळे निधीवाटपात अजित पवार यांनी दुजाभाव केला असल्याचा आरोप होत आहे. यावर आता खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 24 जुलै 2023 | अजित पवार यांनी अर्थखात्याची जबाबदारी स्वीकारताच राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निधीवर्षाव केला आहे. शिंदे गटातील नेत्यांनाही निधी वाटप करून खूश करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला आहे. शिंदे गटाच्या आमदारांपैकी सर्वात जास्त निधी हा भरत गोगावले यांना दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सरोज अहिरे यांच्या मतदारसंघासाठी 40 कोटींचा निधी दिला.शरद पवार यांच्यासोबत असलेले जयंत पाटील यांच्या मतदारसंघासाठी भरभरून निधी दिला आहे. मात्र जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, काँग्रेस आणि ठाकरे गटाला निधी दिलेला नाही. त्यामुळे आमदारांना निधी देताना राजकारण झाल्याचा आरोप होत आहे. निधीवाटपात अजित पवार यांनी दुजाभाव केला असल्याचा आरोप होत आहे. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “निधी वाटपात कोणावरही अन्याय झालेला नाही. सर्व आमदारांना समसमान निधी वाटप झालय. विरोधक आरोप करतायत, पण त्यात तथ्य नाही.”