“मुंबई लोकलमध्ये झालेली घटना निषेधार्थ; पोलिसांना मोकळीक द्या, कठोर शासन झालं पाहिजे,” अजित पवारांचा हल्लाबोल
मुंबईत धावत्या लोकलमध्ये एका 40 वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात आरोपीने मुलीवर बलात्कार केला. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. या घटनेवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नंदुरबार : मुंबईत धावत्या लोकलमध्ये एका 40 वर्षीय व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या मुंबई लोकल ट्रेनच्या लेडीज डब्यात आरोपीने मुलीवर बलात्कार केला. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. या घटनेवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार होणं ही बाब निषेधार्ह आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं. ही घटना घडली त्या लोकलच्या महिला डब्यांमध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्था का नव्हती ? याला कोण जबाबदार आहे ? सुरक्षा व्यवस्था असती तर एका विद्यार्थिनीवरील हा गैरप्रसंग टाळता आला असता “, असं अजित पवार म्हणाले.”पोलिसांना मोकळीक द्या. कठोर शासन झालं पाहिजे. जनतेला सुरक्षित वाटलं पाहिजे, असं काम झालं पाहिजे”, असं देखील अजित पवार म्हणाले.
Published on: Jun 16, 2023 12:06 PM
Latest Videos