छगन भुजबळ म्हणाले ते योग्यच, मविआच्या जागावाटपावर अजित पवार म्हणात, “मविआचा उमेदवार…”
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दावे-प्रतिदावे सुरु आहेत. पुणे लाकसभेवर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे दावा केला होता.
पुणे : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दावे-प्रतिदावे सुरु आहेत. पुणे लाकसभेवर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे दावा केला होता. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्याची जागा काँग्रेस सोडणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान येणाऱ्या आमदारकी-खासदारकीच्या निवडणुकीसाठी मेरीटनुसार मविआचा उमेदवार निवडणून यावा असा विचार असल्याचं अजित पवार म्हणाले. तसेच माध्यमांसमोर जागांबाबत चर्चा नको, हे छगन भुजबळांचं वक्तव्य योग्य असल्याचेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Published on: May 30, 2023 10:26 AM
Latest Videos