“नरहरी झिरवाळ बायकोला खांद्यावर घेऊन नाचवतात, पण…”, अजित पवार असं म्हणाले अन्….
योगादिनानिमित्त महाराष्ट्रात राज्य सरकारने विधान भवनाबाहेर शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे तिन्ही नेते कार्यक्रमाला गेले नाही. अजित पवार आणि नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी नरहरी झिरवाळ यांचा किस्सा सांगितला.
मुंबई : काल योगादिनानिमित्त महाराष्ट्रात राज्य सरकारने विधान भवनाबाहेर शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु हे तिन्ही नेते कार्यक्रमाला गेले नाही. अजित पवार आणि नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी नरहरी झिरवाळ यांचा किस्सा सांगितला. ते म्हणाले की, “जागतिक योग दिनानिमित्त विधिमंडळासमोर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोट्यवधींची उधळण यासाठी केली गेली. तुम्हांला गरज असो की नसो, जाहिरातीच्या माध्यमातून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना बघावं लागतं. योग दिनासाठी मलाही बोलावलं होतं मी गेलो नाही. अंबादास दानवे यांना बोलावलं होतं आणि झिरवळ यांनाही बोलावलं होतं. मी झिरवळ यांना का गेला नाहीत, असं विचारलं तर ते म्हणाले, पोट एवढं वाढलं की योगा होतच नाही. योगा नाही झाला की आजूबाजूचे लोक वाढलेलं पोट बघतात. ते खरं म्हणालेय. योगा होत नाही पण बायकोला खांद्यावर घेऊन नाचू शकतो.” अजित पवार यांच्या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला.