आपली सटकली पाहिजे!; असं अजित पवार का म्हणाले? पाहा…
पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीत नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीकडून सभा घेण्यात येत आहे. यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित आहेत. पाहा...
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीत नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीकडून सभा घेण्यात येत आहे. या प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रात भाजप वाढण्याचं कारण शिवसेना आहे. ते शिवसेनेसोबत होते म्हणून ग्रामीण भागापर्यंत भाजप पक्ष पोहचला, असं अजित पवार म्हणालेत. आता आपली सटकली पाहिजे, नाना काटे यांना निवडून देण्यासाठी जीवाचं रान करा, असं अजित पवार म्हणाले. उध्दव ठाकरेसोबत आम्ही सत्तेत आलो. आमची विचारधारा वेगळी आहे. मतमतांतरे आहेत. पण राज्याचा विकास करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे आलो. दुर्दैवाने तेव्हा कोरोना आला. मात्र आम्ही चांगलं काम केलं. त्याचं सर्वत्र कौतुक झालं, असंही अजित पवार म्हणाले.
Published on: Feb 13, 2023 01:20 PM
Latest Videos