जेव्हा राजकारणात येण्यासाठी अजित पवार यांनी रोहित पवार यांना दिला होता 'तो' सल्ला...

जेव्हा राजकारणात येण्यासाठी अजित पवार यांनी रोहित पवार यांना दिला होता ‘तो’ सल्ला…

| Updated on: Aug 02, 2023 | 2:51 PM

रोहित पवारांच्या राजकीय प्रगल्भतेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रोहित पवार यांची क्रेझ वाढत आहे. मात्र रोहित पवार यांना राजकारणाचे धडे कोणी दिले यावर त्यांचे काका म्हणजेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

कोल्हापूर : आमदार रोहित पवार यांच्या रुपाने पवार घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात आली आहे. रोहित पवार राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत. रोहित पवारांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा दारुण पराभव केला होता.रोहित पवारांच्या राजकीय प्रगल्भतेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रोहित पवार यांची क्रेझ वाढत आहे. मात्र रोहित पवार यांना राजकारणाचे धडे कोणी दिले यावर त्यांचे काका म्हणजेच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “गेली अनेक वर्ष कर्जत जामखेड हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ नव्हता. अनेक वर्ष या मतदारसंघात भाजपची सत्ता होती. परंतु माझा पुतण्या म्हणून मी रोहित पवार यांच कौतुक करत नाही. त्यानेही मला विचारलं मला राजकारणाची इच्छा आहे, मी त्याला सांगितलं की बारामती आणि पुणे सोडून तुला दुसरा जिल्हा निवडावा लागेल. त्यामुळे आम्ही बसून कर्जत-जामखेड या मतदारसंघातून रोहित पवार याला उभं केलं. त्याने मी सांगितल्याप्रमाणे काम केलं म्हणून आज तो तिथला आमदार झाला आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

Published on: May 21, 2023 10:55 AM