पवार-शिंदे भेटीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, यामध्ये गैर काय?

पवार-शिंदे भेटीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, यामध्ये गैर काय?

| Updated on: Jun 02, 2023 | 11:26 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भेटीवर विरोधी पक्षनेते अजित वार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्र्यांना पवारांनी भेटण्यात गैर काय ?”, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.तसेच शरद पवार मुख्यमंत्री शिंदे यांना का भेटले हा काही चर्चेचा विषय नाही. या भेटीमागे राजकीय अर्थ काढू नये असं अजित पवार म्हणाले आहेत.

 

Published on: Jun 02, 2023 11:26 AM