महत्त्वाच्या लोकांच्या हत्या होताहेत, सरकार काय झोपा काढतंय काय?; अजित पवार यांचा सवाल

महत्त्वाच्या लोकांच्या हत्या होताहेत, सरकार काय झोपा काढतंय काय?; अजित पवार यांचा सवाल

| Updated on: Feb 11, 2023 | 11:48 AM

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत पाहा...

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वारिसे यांच्या हत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यात सध्या महत्वाच्या लोकांच्या हत्या होत आहेत. पोलीस, प्रशासन, सरकार काय झोपा काढातंय काय? असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे.शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून समाजातील महत्वाच्या लोकांच्या हत्या होत आहेत. अशा हत्या आम्ही सहन करणार नाही. शशिकांत वारिसे यांच्या हत्येचा मुद्दा आम्ही अधिवेशात मांडणार आहोत, असं अजित पवार म्हणालेत.

Published on: Feb 11, 2023 11:36 AM