जनता कुणाच्या पाठीशी हे दसरा मेळाव्यानंतरच कळेल- अजित पवार
शिवसेना आणि दसरा मेळाव्यावर अजित पवार यांनी भाष्य केलंय.
“शिवसेना स्थापन झाल्यापासून बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर सभा घेतल्या. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना (Shivsena) चालेल, असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. ज्यांच्या हातात पॉवर आहे ते पाहिजे तशा गोष्टी करतात आधी एकाचा आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल वाद घालून चालणार नाही. मात्र जनता कोणाच्या पाठीशी आहे हे शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतरच कळेल. निवडणूक झाल्यानंतर कळेल कोणाची शिवसेना खरी कुणाची ते”, असं विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. “लोकशाही पद्धतीने आलेल्या आमच्या सरकारने कॅबिनेटचा ठराव करून यादी पाठवली होती आम्ही अनेक जण राज्यपालांना भेटायला गेलो होतो. ते तेव्हा म्हणाले होते बघतो करतो तेव्हा तर काय झालं नाही. आता आम्ही काय टीका टिपणी करणार जनतेने ठरवायचं हे लोकशाही पद्धतीने चालला आहे का?”, असंही अजित पवार म्हणाले आहेत.