उद्धव ठाकरे यांच्या भेटीत काय चर्चा झाली? अजित पवार म्हणाले, “आता माझी भूमिका…”
राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे पिता-पुत्राने अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे अजित पवारांना भेटले. मात्र या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
मुंबई, 20 जुलै 2023 | राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे पिता-पुत्राने अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे अजित पवारांना भेटले. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. मात्र या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि माझे अनेक वर्षांचे संबंध आहेत. आम्ही अडीच वर्ष एकत्र सरकार चालवलं आहे. मी उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मला फोनवरून अभिनंदन केलं होतं. राजकीय आणि कौटुंबिक संबंध वेगळे असतात. आम्ही कधी एकमेकांचा बांध कधी रेटला नाही , त्यामुळे आम्ही एकामेकांचे दुश्मन नाही. आता माझी भूमिका वेगळी आहे, त्यांची वेगळी आहे. आमच्या भेटीत काही राजकीय चर्चा नव्हती.”
Published on: Jul 20, 2023 08:47 AM
Latest Videos