शरद पवारांच्या  टीकेवर अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, शिवतारे संस्कारानुसार बोलले...

शरद पवारांच्या टीकेवर अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “शिवतारे संस्कारानुसार बोलले…”

| Updated on: Jun 16, 2023 | 11:19 AM

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे गुरुवारी नंदुरबार दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली असून, या बैठकीला कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी तळागाळा पोचवण्याचे आदेश दिले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचा समाचार घेतला.

नंदूरबार : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे गुरुवारी नंदुरबार दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली असून, या बैठकीला कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी तळागाळा पोचवण्याचे आदेश दिले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचा समाचार घेतला. शिवतारे यांनी शरद पवार यांच्यावर राजकारणाच्या रक्षक असल्याचं वक्तव्य केलं होतं. याला अजित पवार यांनी उत्तर देत सांगितलं, “अशा लोकांना आम्ही किंमत देत नाही. कोणीही काही बोलत असतात. ज्यांना लोक निवडून देत नाही त्यांना आमच्याजवळ कुठलीही किंमत नाही. शिवतारे यांना पुरंदर विधानसभा मतदारसंघात नाकारलं आहे, ते नेहमीच असं काही बोलतात. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, वडिलधाऱ्यांचा आदर करणं. पण यांच्यावर संस्कारचं असे झाले तर काल बोलणार”.

Published on: Jun 16, 2023 11:19 AM