Ajit Pawar : मुंबईला आलेली धमकी गांभीर्याने घ्यायला हवी, अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar : मुंबईला आलेली धमकी गांभीर्याने घ्यायला हवी, अजित पवारांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 20, 2022 | 10:54 AM

काही दिवसांपूर्वी शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट हरिहरेश्वर किनाऱ्याजवळ आढळून आली होती. त्यानंतर आता मुंबईच्या ट्राफिक कंट्रोल रुमला धमकीचा मॅसेज आला आहे.  या मॅसेजमुळे एकच खळबळ उडाली आहे. वाचा...

मुंबई : मुंबईला पुन्हा एकदा धमकी आली आहे.  ट्राफीक कंट्रोलला (Mumbai Traffic Control) धमकीचा मॅसेज आला आणि राज्यात एकच खळबळ उडाली. 26 /11 सारखा हल्ला (Mumbai 26/11 Attacked) करणार असा धमकीचा मॅसेज आल्याची माहिती आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘मुंबईला आलेली धमकी गांभीर्याने घ्यायला हवी. मुकेश अंबानी यांच्यासंदर्भातही मागे धमकी आली होती. या धमक्या गांभीर्यानं घेतल्या गेल्या पाहिजे. केंद्र सरकारनं देखील त्याकडे लक्ष द्यावं. कुठल्याही राज्य सरकारांना अशा धमक्या येतात. त्याची चौकशी झाली पाहिजे. राज्य सरकारनं याची दखल घेतली पाहिजे. त्यासह केंद्रानं देखील याकडे लक्ष दिलं पाहिजे.’ यातच काही दिवसांपूर्वी शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट हरिहरेश्वर किनाऱ्याजवळ आढळून आली होती. त्यानंतर हा मॅसेज आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

Published on: Aug 20, 2022 10:54 AM