राष्ट्रवादीत राजकीय लढाई आणखी तीव्र; अजित पवार यांनी उचलले महत्वाचे पावल

राष्ट्रवादीत राजकीय लढाई आणखी तीव्र; अजित पवार यांनी उचलले महत्वाचे पावल

| Updated on: Jul 04, 2023 | 11:15 AM

राष्ट्रवादीतील बंडखोरांच्या हाकालपट्ट्या केल्या जात आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना पदावरून हटवले आहे. तोच राज्यातील राष्ट्रवादी भक्कम करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांच्यावर सोपवली आहे. याचदरम्यान ते देकील स्वत: मैदानात उतरले आहेत.

मुंबई : अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते चांगलेच कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीतील बंडखोरांच्या हाकालपट्ट्या केल्या जात आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना पदावरून हटवले आहे. तोच राज्यातील राष्ट्रवादी भक्कम करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांच्यावर सोपवली आहे. याचदरम्यान ते देकील स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यांनी याबाबत पुढचे पाऊल उचलताना, राज्यातील सगळ्या जिल्हाध्यक्षांना संपर्क करायला सुरुवात केली आहे. तसेच जिल्हाध्यक्षांना आपल्या सोबत येण्याचं आव्हान त्यांच्याकडून केलं जात आहे. तर 5 तारखेच्या बैठकीसाठी अजित पवारांकडून हालचाली सुरू असून अध्यक्ष यांना तो निर्णय कळविण्यात येणार आहे. तसेच त्याच बैठकिला जिल्हाध्यक्षांना येण्याच्या सुचना देखील करण्यात येणार आहेत.

Published on: Jul 04, 2023 11:15 AM