“गिरीश महाजन आता तीन पक्षाचं सरकार, यापुढे राष्ट्रवादीचे झेंडे…”, अजित पवार यांनी बोलून दाखवली ‘ही’ नाराजी
काल जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. मात्र या कार्यक्रमात झेंड्याचा प्रश्न सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरला.
धुळे : काल जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. मात्र या कार्यक्रमात झेंड्याचा प्रश्न सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लावला नसल्याची खंत अजित पवार यांनी आपल्या भाषणा दरम्यान बोलून दाखवली आहे. ते म्हणाले की, ” गिरीश महाजन तुम्ही आता पालक मंत्री आहात, मी बघत होतो सगळी उत्तम आणि दिमाखदार व्यवस्था केली आहे. मी अशा प्रकारचा मंडप तर पाहिलाच नाही. परंतु आता तीन पक्षांचं सरकार आहे, दोन पक्षांचे झेंडे लावले तसे आता राष्ट्रवादीचे झेंडे लावायला सुरुवात करा अशी विनंती मी तुम्हाला करतो. जरी आपण इकडे, तिकडे असलो तरी प्रत्येकाचा उद्देश हा देशाचं भलं व्हावं आणि करीश्मा असणारं नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रुपाने मिळालं आहे.”