बैठकीत अस काय झालं? अजित पवार म्हणाले, तर मी राजीनामा देईल?

बैठकीत अस काय झालं? अजित पवार म्हणाले, तर मी राजीनामा देईल?

| Updated on: Jan 10, 2023 | 6:02 PM

अशा उपटसुंभ लोकांना उत्तरे द्यायला मी बांधील नाही. त्याच्या प्रश्नावर उत्तर देण्यास मी बांधील नाही. त्याचे डिपॉझिट जप्त करुन पाठवलंय. तो काही ऐवढा मोठा नेता लागून गेला नाही.

मुंबई : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार हे संपाल्याचे दिसून आले. यावेळी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये बोलताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार व शरद पवार यांच्यांवर जोरदार टीका केली होती. त्याच्यावर ही बोलताना पडळकर यांचा योग्य समाचार घेतला.

पडळकर यांनी अजित पवार व शरद पवार यांच्यांवर जोरदार टीका करताना, , ५० वर्षे तुम्ही राज्य केलात. कुणालाही चाळीस वर्ष दिली तर तो जिल्ह्याचा विकास करेल. पण तुम्ही फक्त बारामतीचाच केलात. त्यांच्या या टीकेवर पत्रकांरांनी विचारले असता. ते भडकले.

नाशिकमध्ये बोलताना पडळकर यांनी अजित पवार व शरद पवार यांच्यांवर जोरदार टीका होती. त्याला पवार यांनी उत्तर दिलं. अशा उपटसुंभ लोकांना उत्तरे द्यायला मी बांधील नाही. त्याच्या प्रश्नावर उत्तर देण्यास मी बांधील नाही. त्याचे डिपॉझिट जप्त करुन पाठवलंय. तो काही ऐवढा मोठा नेता लागून गेला नाही.

तर कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले हे सिद्ध झाल्यास आपण राजकारण सोडून देऊ, असे अजित पवार यांनी सांगितलं. सोम्या गोम्यांचा प्रश्नाला उत्तर न देता ज्यांची जनमानसात प्रतिमा आहे, त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देईल

Published on: Jan 10, 2023 06:02 PM