सत्यजित निवडून आलाय, पण आता ‘असा’ निर्णय घे; अजित पवार यांनी वडिलकीच्या नात्याने सल्ला दिला
नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांचा विजय झाला. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्यजित यांच्या विजयानंतर वडिलकीच्या नात्याने सल्ला दिलाय. पाहा काय म्हणाले...
काल विधान परिषदेच्या जागांचा निकाल लागला. या निकालावर प्रतिक्रिया येत आहेत. नाशिकमध्ये सत्यजित तांबे यांचा विजय झाला. पण सत्यजित यांचं बंड चर्चेत राहिलं. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्यजित यांच्या विजयानंतर वडिलकीच्या नात्याने सल्ला दिलाय. “सत्यजित तांबे अभ्यासू युवा नेता आहे. तो निवडून आलाय. त्याचं मनापासून अभिनंदन. काय निर्णय घ्यायचा हा हा सर्वस्वी सत्यजितचा निर्णय आहे. पण मला वाटतं. सत्यजित असो की सुधीर तांबे यांचे काँग्रेससोबत घरचे संबंध आहेत. सत्यजितने काँग्रेससाठी, तरूणांसाठी खूप काम केलं आहे. त्याने दुसरा कोणताही विचार न करा काँग्रेससोबतच राहावं, असं अजित पवार म्हणालेत.
Latest Videos