“आता आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, मनाला वाटेल तिथं जाणार”, बंडानंतर अजित पवार स्पष्टच बोलले…
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागीही झाले आहेत. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यावर आरोप केले जात आहेत.
मुंबई: अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागीही झाले आहेत. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. “आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहोत, मला जिथं वाटेल तिथं जाणार”, असं म्हटलं आहे. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार माझ्यासोबत आहेत आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे शरद पवारच राहणार आहेत’, असेही स्पष्टपणे सांगितले.
Published on: Jul 04, 2023 10:24 AM
Latest Videos