नितीन देसाई मृत्यूप्रकरणी एडलवाईज कंपनीवर कारवाई करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं…
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. यानंतर सर्व स्तरातून याबद्दल शोक व्यक्त केला जातोय. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
मुंबई, 04 ऑगस्ट 2023 | सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. यानंतर सर्व स्तरातून याबद्दल शोक व्यक्त केला जातोय. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांनी देसाई यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.यावेळी अजित पवार यांनी माध्यामांशी संवाद साधला. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली आहे. त्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल असे अश्वासन दिल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.
Published on: Aug 04, 2023 10:28 AM
Latest Videos