अजिर पवार यांच्याकडून वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर संताप; म्हणाले ‘हे प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे’
यावरून विरोधकांनी सरकारला निशान्यावर घेतलं आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी सरकावर घणाघात करत टीका केली होती. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील याप्रकरणी प्रशासनाला चांगलेच फटकारलं आहे.
सातारा : आळंदीहून निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला. यामुळे सध्या शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. यावरून विरोधकांनी सरकारला निशान्यावर घेतलं आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी सरकावर घणाघात करत टीका केली होती. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील याप्रकरणी प्रशासनाला चांगलेच फटकारलं आहे. तसेच त्यांनी यावरून सखोल चौकशीची मागणी केली आहे. अजित पवार यांनी याप्रकरणी, पोलीस लाठीमाराची घटना क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलीस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असं अजित पवार म्हणाले.