Ajit Pawar : ‘सुतासारखे सरळ करायचंय त्यांना… नाही मातीत घातला तर…’, दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर

Ajit Pawar : ‘सुतासारखे सरळ करायचंय त्यांना… नाही मातीत घातला तर…’, दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर

| Updated on: Apr 03, 2025 | 2:38 PM

उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार बीडमध्ये होते आणि यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसातील घटनांचा आढावा घेतलाय. बीडमध्ये ज्या गँग तयार आहेत त्यांना सुतासारखं सरळ करणार असा इशाराच दादांनी दिलाय.

पालकमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये येऊन राख माफियां पासून ते अधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील सज्जड दम भरलाय. बीडमध्ये राख, वाळू माफिया आणि भूखंड गँगवाल्यांची दहशत लपून राहिलेली नाही. मात्र या गँगला सुतासारखा सरळ करणार असल्याचा इशाराच अजित पवार यांनी दिलाय. सरकारी अधिकारी ही वर्षानुवर्षे बीडमध्येच राहतात आणि संगठीत गुन्हेगारीला पाठीशी घालतात, असा आरोप सुरेश धसांपासून ते बीडच्या लोकप्रतिनिधींनी केला. त्यावर देखील अजित पवार यांनी आता बदली होणार म्हणत अधिकाऱ्यांना तयार राहण्याचे अप्रत्यक्ष आदेशच दिले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून ही अजित पवारांनी पारदर्शक चौकशी सुरू असल्याचं म्हटलंय. धागा दोरे सापडल्यास कोणालाही पाठीशी घालणार नाही, असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केलाय. अजित पवार यांनी पक्षाच्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना देखील सोडलं नाही सरकार असल्यामुळे आपलं कोण काय करणार अशा अविर्भावात राहू नका नाहीतर मीच पोलिसांना टायर मध्ये टाकायला सांगेन असा इशाराच कार्यकर्त्यांना दिलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Apr 03, 2025 02:35 PM