Ajit Pawar : ‘ही कोणती पद्धत झाली?’, छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी सुनावलं
Baramati Chhatrapati Sugar Factory : बारामतीच्या छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलेच खडेबोल सुनावलेले बघायला मिळाले आहेत.
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना चांगलाच इशारा दिला आहे. तसंच संचालकांवर नाराजी देखील व्यक्त केली आहे. वॉचमनला धाक दाखवून संचालक आपले ऊसाचे ट्रॅक्टर रिकामे करतात. अशी पद्धत कारखान्यात या पूर्वी कधीच नव्हती, असं म्हणत अजित दादांनी या संपूर्ण प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.
कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘कारखान्यात ट्रॅक्टर घेऊन आल्यावर चालकाने फोन केला की संचालक तिथे येऊन वॉचमनला धमकवतात आणि आपला ट्रॅक्टर रिकामा करून घेतात. मग बाकीचे संचालक नाही ही त्यांची चूक आहे का? अशी कोणती पद्धत आहे? ही पद्धत कधीही या कारखान्यात यापूर्वी नव्हती’, असं अजित पवार यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.

काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्...

'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली

दोन भाऊ एकमेकांना भेटत असतील तर भेटू द्या; राऊतांचं भावनिक विधान

संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराडची दहशत अजूनही कायम
