Ajit Pawar : कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल.., अजितदादांनी कार्यकर्त्यांना दम भरला
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. सकाळपासूनच त्यांनी बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी सुरू केलेली आहे.
बारामतीत आज दिव्यांगांना मोफत सायकल वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना अजितदादांनी कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरलेला आहे. काहीही चुकीचं केलं तर मी पोलिसांना मकोका लावायला सांगेल, अशी धमकीच आता अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेली बघायला मिळाली आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, परवा माझ्याकडे एक क्लिप आली. सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये एकाला बेदम मारहाण करण्यात आली असल्याचं दिसत होतं. कुत्र्याला जसं मारत असतील तसंच मारलं. मी पोलिसांना सांगितलं कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. हे जर पुढे असंच चालत राहिलं तर मी मकोका लावीन, माझ्या जवळच्या कार्यकर्त्याच्या मुलाने जरी असं केलं तरी त्यांना सुद्धा नियम सारखाच असेल, असा इशारा देखील अजित पवारांनी यावेळी दिला.

पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड

गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...

'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...

हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
