...अन् अजितदादांसमोर शेतकऱ्याला रडू आवरलं नाही

…अन् अजितदादांसमोर शेतकऱ्याला रडू आवरलं नाही

| Updated on: Jul 30, 2022 | 12:26 AM

नुकसान भरपाई कोणत्या कोणत्या गोष्टींना दिली जाते त्याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा अजित पवार यांच्यासमोर मांडली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या पूरस्थिती भागाचा दौरा करत आहे. अजित पवार यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना यवतमाळमधील शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानीचा गाऱ्हाणा अजित पवार यांच्यासमोर मांडला. त्यावेळी शेतकऱ्यांना त्यांच्या समोर आपलं दुःख सांगताना त्यांचे रडू त्यांना आवरता आले नाही. यावेळी अजित पवार यांनीही त्यांना शांत राहण्यासाठी सात्वंन करत त्यांच्या नुसानीची चौकशी केली. यावेळी अजित पवार यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून कोणकोणत्या गोष्टींचा पंचनामा केला जातो, नुकसान भरपाई कोणत्या कोणत्या गोष्टींना दिली जाते त्याची माहिती घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा अजित पवार यांच्यासमोर मांडली आहे.

Published on: Jul 30, 2022 12:26 AM