'अजित पवार यांची १००० कोटीची संपत्ती मिळाली...,' काय म्हणाल्या अंजली दमानिया

‘अजित पवार यांची १००० कोटीची संपत्ती मिळाली…,’ काय म्हणाल्या अंजली दमानिया

| Updated on: Dec 07, 2024 | 4:18 PM

एकीकडे अजितदादा यांचा भाजपा प्रणीत महायुती सरकारमध्ये सहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होत आहे.तर दुसरीकडे त्यांची १००० कोटीची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती परत मिळाली आहे.यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महत्वाचे विधान केले आहे.

बीएफएस केमिकल्स नावाची जी कंपनी आहे.ज्याच्या सुनेत्रा पवार डायरेक्टर होत्या. या कंपनीतून पैसा आला पहिला स्पार्कलिंग सॉईलमध्ये, स्पार्कलिंग सॉईलमधून पैसा जरंडेश्वर शुगरमध्ये, जरंडेश्वरमधून पैसा आला त्या जरंडेश्वर विकत घेणाऱ्या गुरु कमोडीटीमध्ये असा हा सगळा पैसा फिरवला गेला आहे. इन्कम टॅक्सने यात सरळसरळ बेनामी संपत्ती असा उल्लेख केला आहे. अजित पवार , सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची ही बेनामी प्रॉपर्टी असल्याचे इन्कम टॅक्स विभागाने म्हटले आहे. मग अडलं कुठे आणि थांबवले कोणी असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. आज त्यांना पद मिळाले उपमुख्यमंत्री जे ते सहा वेळा भूषवित आहेत. एक हजार कोटीची जप्त केलेली मालमत्ता परत दिली तर अजित पवार इतर कुठे जातीलच कशाला ? हा जो सर्व खेळ सुरु आहे, की यंत्रणांचा वापर करायचा केसेस टाकायच्या ब्लॅकमेल करायचे हे चित्र जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत राजकारणात चांगले होणार नाही कारण सर्वत पक्षात हेच सुरु असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.सगळ्यांच्या फायली यांच्याकडे आहेत हेच दाखवून ब्लॅकमेल करुन आपल्या पक्षात घेतले जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

Published on: Dec 07, 2024 04:17 PM