‘आम्ही काही बेआक्कल आहे का?’; नाना पटोले यांनी थेट अजित पवार यांचा सवाल
त्याचबरोबर 15 ऑगस्टला झेंडा कोण फडकवणार याबाबत सरकारमध्ये संभ्रम असून पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्याने जिल्ह्याधिकारी आणि आयुक्तांच्या हातून तो केला जाणार असल्याची टीका केली होती.
पुणे, 12 ऑगस्ट 2023 | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ध्वजारोहनाच्या प्रसिद्ध झालेल्या यादीवरून जोरदार निशाना साधला होता. त्याचबरोबर 15 ऑगस्टला झेंडा कोण फडकवणार याबाबत सरकारमध्ये संभ्रम असून पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या रखडल्याने जिल्ह्याधिकारी आणि आयुक्तांच्या हातून तो केला जाणार असल्याची टीका केली होती. त्याचबरोबर पटोले यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवून आहेत असा आरोप केला होता. त्यावरून आज चांदणी चौक पुलाचे उद्घाटना प्रसंगी अजित पवार यांनी जोरदार बॅटींग करताना विरोधकांसह नाना पटोले यांचा समाचार घेतला. यावेळी अजित पवार यांनी, अजित म्हणाले की, अफवांवर लक्ष देऊ नये. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून ते चांगले काम करत आहेत. ही खुर्ची आम्हा दोघांना (अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस) कशाला हवी आहे. आम्ही काही बे आक्कल आहे का? खुर्ची एक आणि डोळे दोघांचे कसे चालेल? ती खुर्ची भरलेली आहे. व्यक्ती बसलेली आहे. आम्ही बोललो नाही तर लोकांना एकच बाजू दिसते म्हणून आज बोलावं लागलं असे देखील अजित पवार म्हणाले.