अदानींवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत, मग गैर काय? अजित पवार यांचा सवाल

अदानींवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत, मग गैर काय? अजित पवार यांचा सवाल

| Updated on: Apr 21, 2023 | 1:36 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं आहे. त्यांनी, शरद पवार यांनी नाही तर गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगितलं आहे

पुणे : उद्योजक गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली त्यानंतर अनेकांनी टीका केली. तर काहींनी थेट शरद पवार यांनी अदानी यांची भेट घेतल्याचे सांगत टीका केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं आहे. त्यांनी, शरद पवार यांनी नाही तर गौतम अदानी यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगितलं आहे. तर तर एखाद्या एक्स वाय झेड व्यक्तीवर काही आरोप झाला असेल. तो त्या संदर्भामध्ये म्हणणं मांडण्याच्या करता किंवा आणि कशासाठी भेट घेत असेल तर त्यात गैर काय? पवार यांनी अदानी यांची भेट घेतलेली नाही. दोघांची खूप पूर्वीपासून ओळख आहे. हे दोघांनीही लपविलेले नाही. तसेच अदानींवरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे अदानी आणि पवार यांच्या भेटीत गैर काहीच नाही, असेही अजित पवार यांनी सांगितलं आहे.

Published on: Apr 21, 2023 01:29 PM