वादग्रस्त वक्तव्य प्रकरणानंतर अजित पवार यांचा सुजय विखेंना फोन
संगमनेर तालुक्यात धांदरफळ येथे भाजपाच्या सभेत वसंत देशमुख यांनी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली आहेत. त्यावरुन राजकारण तापले आहे. या प्रकरणात अजितदादांनी आता सुजय विखे पाटील यांनी फोन करुन समजावल्याचे म्हटले जात आहे.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपाचे नेते वसंत देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले आहे. या प्रकरणानंतर धांदरफळ आणि परिसरात दोन्ही गटात हाणामारी तोडफोड झाली आहे.दरम्यान या प्रकरणानंतर अजितदादा पवार यांनी सुजय विखे पाटील यांना फोन केला आहे. अजित पवार यांनी सुजय विखे पाटील यांची चांगलीच कान उघाडणी केल्याचे सांगण्यात येत आहे. वादग्रस्त विधाने करुन महायुतीला अडचणीत आणू नये असे अजितदादा पवार यांनी फोन करुन सुजय विखे यांना सांगितल्याचे समजते. लोकसभा निवडणूकांच्या वेळी महायुतीतील नेत्यांनी अशाच प्रकाराची वादग्रस्त विधाने केली होती. त्याचा फटाका नंतर मतदानात बसला होता. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य टाळावीत अशी कानउघाडणी अजित पवार यांनी केल्याचे समजते.
Published on: Oct 26, 2024 06:14 PM
Latest Videos