Naresh Mhaske : मुख्यमंत्री होता आले नाही याची खंत अजित पवारांच्या मनात कायम..! म्हस्केंचा आरोप कुणावर..?
शिंदे हे घरोघरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेत आहेत. हे देखील त्यांना पटलेले नाही. श्रद्धेचे देखील राजकारण अजित पवार यांनी करण्यास सुरवात केल्याचे म्हस्के यांनी सांगितले आहे. म्हस्के हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. मुख्यमंत्र्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. म्हणूनच त्यांचे नेतृत्व सर्वसामान्य जनतेने मान्य केले आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोललो नाही तर आपले विरोधी पक्षनेते पदही जाईल ही भीती असल्याने अजित पवार हे त्यांच्यावर टीका करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुंबई : राज्याचा मुख्यमंत्री व्हावे हे (Ajit Pawar) अजित पवार यांचे स्वप्न कायम राहिलेले आहे, तशी संधीही आली होती. आमदारांचे संख्याबळ अधिकचे असतानाही (Sharad Pawar) शरद पवार यांनी मात्र, ही संधी कॉंग्रेसला दिली. त्यानंतर पहाटेचा शपथविधी करुन त्यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे प्रयत्न केले मात्र, ते देखील शरद पवार यांनी होऊ दिले नाही. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातील असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले ही सल त्यांना बोचत असावी अशी टीका (Naresh Mhaske) म्हस्के यांनी केली आहे. शिंदे हे घरोघरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेत आहेत. हे देखील त्यांना पटलेले नाही. श्रद्धेचे देखील राजकारण अजित पवार यांनी करण्यास सुरवात केल्याचे म्हस्के यांनी सांगितले आहे. म्हस्के हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. मुख्यमंत्र्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. म्हणूनच त्यांचे नेतृत्व सर्वसामान्य जनतेने मान्य केले आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोललो नाही तर आपले विरोधी पक्षनेते पदही जाईल ही भीती असल्याने अजित पवार हे त्यांच्यावर टीका करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.