Ajit Pawar : अजित पवारांची सभागृहात फडणवीसांवर टोलेबाजी, सत्तांतराचाही सांगितला किस्सा..!

Ajit Pawar : अजित पवारांची सभागृहात फडणवीसांवर टोलेबाजी, सत्तांतराचाही सांगितला किस्सा..!

| Updated on: Aug 22, 2022 | 7:53 PM

एवढे असून गिरीश महाजन तुम्ही एकनिष्ठ असतानाही तुमचं ग्रामविकास खात्यावर भागवले गेले आहे. अन्यथा दूर फेकला गेला असता असाही टोला अजित पवार यांनी लगावला आहे. विरोधी पक्षात असतानाही कामाच्या धडाक्याबरोबरच अजित पवार विरोधकांचाही चांगलाच समाचार घेत आहे.

मुंबई : स्पष्टोक्तेपणा आणि रोखठोक भूमिकेवरुन अजित पवार यांची एक वेगळीच छबी निर्माण झाली आहे. हे सत्तांतर नेमके कसे झाले याबाबतचा त्यांनी मजेशीर किस्सा सभागृहात सांगितला. तुम्ही काहीही करु शकता हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. तुम्ही बसून-बसून कसा भुंगा लावला हे कुणाला कळले देखील नाही. सत्तांतराशी आमचा काय संबध नाही, त्याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत अशी भूमिका भाजपाने वेळोवेळी घेतली पण एका राज्यातील भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांनीच जाहीर केले की या राज्यातील एक पक्ष फोडून आम्ही सत्तांतर कसे करतो ते त्यांनीच सांगितल्याने सर्व चित्र स्पष्ट झाले. एवढे असून गिरीश महाजन तुम्ही एकनिष्ठ असतानाही तुमचं ग्रामविकास खात्यावर भागवले गेले आहे. अन्यथा दूर फेकला गेला असता असाही टोला अजित पवार यांनी लगावला आहे. विरोधी पक्षात असतानाही कामाच्या धडाक्याबरोबरच अजित पवार विरोधकांचाही चांगलाच समाचार घेत आहे.

Published on: Aug 22, 2022 07:53 PM