कुणाचे फोन आले तरी हळवं बनू नका, अजितदादा पवार याचं कार्यकर्त्यांना आवाहन
बालेवाडीत ऑलंपिक भवन उभारण्याचे आपले 14 वर्षांपासूनचे स्वप्न होते. शेवटी क्रीडा विभाग राष्ट्रवादीकडे आल्यानंतर हे काम मार्गी लागत आहे. येथे 72 कोटी खर्च करून दीड लाख स्वेअर फूटाचे काम होणार आहे. क्रीडा क्षेत्राला त्यामुळे अधिक प्रोत्साहन मिळणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्ता मेळाव्यात म्हटले आहे.
पुणे | 11 जानेवारी 2024 : आपल्या पक्षाने कायम बहुजनांच्या हिताचा विचार केला आहे. नेहमी वंचितांच्या बाजूने काम केले आहेत. काही जण गैरसमज पसरवत आहेत. परंतू आपली विचारधारा कायम असल्याचे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे येथील पक्षांच्या कार्यकर्ता मेळाव्यात स्पष्ट केले आहे. पंधरा पंधरा वर्षे न फोन करणारे आता फोन करुन विचारत आहेत. काय कसं काय चाललंय. आपली ती बूथवरील यादीतील नंबर आहेत ते, त्यामुळे काही भावनिक होऊ नका. माझ्याकडे फोन करायला वेळ नाही. फोन करत बसलो सगळा वेळ त्यातच जाईल, परंतू काहीही काम माझ्याकडे आणा त्याचा मी तुकडा पाडतोच असे पवार यांनी यावेळी सांगितले. तुकडा पाडतो म्हणजे ते काम मी पूर्ण करतो. किंवा माझे सहकारी ती कामे करतात असेही पवार यांनी बालेवाडीत ऑलंपिक भवन उभारण्यासाठी मी 14 वर्षे पाठपुरावा करीत होतो. अखेर क्रीडा विभाग आपल्याकडे आल्यानंतर हे काम मार्गी लागणार असल्याचे पवार यांनी सांगितले.