Video | ‘निलेश लंके पारनेर पुरताच.. त्याच्या डोक्यात हवा…,’ काय म्हणाले अजितदादा
अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्याबद्दल विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. निलेश लंके यांना खासदारकी लढवायची आहे. याबाबत त्यांनी इच्छा बोलून दाखविली आहे. याबाबत अजितदादा पवार यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
पुणे | 14 मार्च 2024 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याने ते कोणत्या गटात जातात याकडे लक्ष लागले आहे. परंतू त्यांनी आपल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी शरद पवार यांना भेटायला आल्याचे स्पष्ट करीत अधिक बोलण्यास नकार दिला आहे. निलेश लंके यांना खासदारकीला उभे राहायचे आहे. त्यांना अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवायची आहे. मात्र अजितदादा पवार यांनी निलेश लंके जाऊ शकत नाही. तसं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल. राजीनामा देवून कुठेही जाता येते. वास्तविक निलेशला पक्षात मी घेतले. निलेशला आधार मी दिला. मी आताही निलेशला विकासकामांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत केली आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. कालच तो आला होता. त्याच्या डोक्यात कोणीतरी खासदार होऊ शकतो अशी हवा भरविली आहे. फार तर पारनेरपुरता तो पॉप्युलर आहे. इतर ठीकाणी अपघड आहे, आपण त्याला समजवले तर आहे बाकी त्याचा निर्णय असे अजितदादा पवार यांनी म्हटले आहे.