अजितदादांना ‘त्या’ कारणाची अजूनही वाटते खंत, पाहा कोणते आहे ‘ते’ कारण
सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सर्व समाजाला प्रतिनिधित्व दिले. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण सर्वाना प्रतिनिधित्व दिले. लोकसभेच्या निवडणुकीत तुमची ताकत कळेल आपण महायुती म्हणून निवडणूक लढवणार आहोत. लोकसभेला चांगले यश कसे मिळेल प्रयत्न करू असे अजित पवार म्हणाले.
संभाजीनगर : 16 सप्टेंबर 2023 | मराठवाडा 75 व्या सांगता समारोह निमित्ताने राज्य मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगर येथे झाली. यानंतर अजित पवार यांनी छत्रपती कॉलेज येथील एका कार्यक्रमात बोलताना आपल्या मनातील खंत व्यक्त केली. आम्ही काही राजकीय निर्णय घेतले. त्याला सर्वांनी साथ दिली. प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. सत्तेचा फायदा शेवटच्या नागरिकांपर्यंत गेला पाहिजे. काम करताना कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे असे ते म्हणाले. राष्ट्रवादीचे काम करताना आम्ही बेरजेचे राजकारण केले. जातीपातीचे, नात्यागोत्याचे राजकारण केले नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढवायची आहे. आपण काम केले तर आपल्या मागे लोक येतात. आमच्याकडून एखादी चूक झाली आणि तुम्ही ती लक्षात आणून दिली तर ती चूक लगेच दुरुस्त करतो. सहकारी संस्था चालवताना आपण संस्थेचे मालक नसतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकही जागा निवडून आणता आली नाही याची मला खंत वाटते, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.