वेदांतावरून महाराष्ट्रातील तरुणांना अजितदादांचा सल्ला; नेमकं काय म्हणाले अजित पवार?

वेदांतावरून महाराष्ट्रातील तरुणांना अजितदादांचा सल्ला; नेमकं काय म्हणाले अजित पवार?

| Updated on: Sep 15, 2022 | 1:16 PM

वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच मुद्द्यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच मुद्द्यावरून आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आल्याने दीड लाख तरुणांचा रोजगार गेल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तरुणांनी वेदांतावरून पेटून उठलं पाहिजे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. प्रकल्पाच्या नावाखाली सरकार जनतेला गाजर दाखवत आहे. एकनाथ शिंदे हे सकाळी सहावाजेपर्यंत काम करतात तर मग उठतात कधी असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला आहे.

Published on: Sep 15, 2022 01:14 PM